नागरिक सेवा — Citizen Services
ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणाऱ्या सेवा (Citizen Services)

जन्म नोंदणी
गावातील जन्म झालेल्या बालकासाठी अधिकृत जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
🧾 सेवेची प्रक्रिया:
- हॉस्पिटल/डॉक्टरकडून जन्म प्रमाणपत्र घ्यावे ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा तपासणी करून ७ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाईल
📑 आवश्यक कागदपत्रे: जन्म प्रमाणपत्र (हॉस्पिटल/डॉक्टर), आई-वडिलांचे आधार कार्ड
⏱ कालमर्यादा: ७ कार्यदिवस
पदनिर्देशित अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी

मृत्यू नोंदणी
गावातील नागरिकांच्या मृत्यूची अधिकृत नोंद करण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
🧾 सेवेची प्रक्रिया:
- मृत्यूची माहिती संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबियांनी ग्रामपंचायत कार्यालयास कळवावी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा तपासणीनंतर प्रमाणपत्र देण्यात येईल
📑 आवश्यक कागदपत्रे: वैद्यकीय मृत्यू प्रमाणपत्र,कुटुंब ओळखपत्र,अर्जदाराचा ओळख पुरावा, शुल्क: ₹२० (अर्ज शुल्क)
⏱ कालमर्यादा: ७ कार्यदिवस
पदनिर्देशित अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी

विवाह नोंदणी
लग्नाचे अधिकृत नोंदणी व विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे.
🧾 सेवेची प्रक्रिया:
- विवाहानंतर दोन्ही पक्षांनी संयुक्त अर्ज भरावा आवश्यक कागदपत्रांसह ग्रामपंचायतीकडे सादर करावा तपासणी व पडताळणीनंतर प्रमाणपत्र दिले जाईल
📑 आवश्यक कागदपत्रे: विवाहाचे दस्तऐवज (लग्न प्रमाणपत्र / फोटो पुरावा),दोन्ही पक्षांचे ओळखपत्र,दोन साक्षीदारांची ओळखपत्रे , शुल्क: ₹२० (अर्ज शुल्क)
⏱ कालमर्यादा: ७ कार्यदिवस
पदनिर्देशित अधिकारी: ग्रामपंचायत अधिकारी
- जन्म दाखला
- मृत्यू दाखला
- विवाह नोंदणी
- बीपीएल दाखला
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी (डोमिसाईल) प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र
- अन्न परवाना (फूड लायसन्स)
- उद्योग आधार नोंदणी
- डिजिटल ७/१२ उतारा
- विजेचे बिल भरणे
- पॅन कार्ड
- राजपत्र (गॅझेट) नोंद
- ई-श्रम कार्ड
- संजय गांधी निराधार योजना
- श्रावण बाल योजना